Ajit Gavhane: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विलास लांडेंचे समर्थक आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आज शरद पवारांची तुतारी हातात घेणार आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ही शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाआधी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दादांची साथ सोडून शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?
अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे.
भोसरी विधानसभेचा चुकीच्या पध्दतीने विकास झाला. पैसे खर्च करून देखील काही उपयोजना दिसत नाहीत. येथे नियोजनबध्द पध्दतीने विकास करणे गरजेचे आहे. पुढची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे, मी गेल्या काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न देखील करत आहे. त्या दृष्टीकोनातून मी अनेक दिवस झाले प्रयत्नशील होतो. त्याप्रमाणे मी काम देखील करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षासोबत याठिकाणी काम करण्यास मी इच्छुक नाही, अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असताना देखील शहराचा विकास झालेला नाही, त्याचबरोबर आगामी विधानसभा लढवण्याच्या अनुषंगाने ते शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत जात असल्याचं त्यांनी एबीपीशी बोलताना सांगितलं आहे.
आज शरद पवारांची तुतारी फुंकणाऱ्यांची नावं
अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव - कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले - माजी महापौर
वैशाली घोडेकर - माजी महापौर
समीर मासुळकर - माजी नगरसेवक
पंकज भालेकर - माजी नगरसेवक
समीर वाबळे - माजी नगरसेवक
गीता मंचरकर - माजी नगरसेवक
वैशाली उबाळे - माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे - माजी नगरसेवक
विनया तापकीर - माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे - माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे - (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने - पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे - माजी नगरसेवक
संजय नेवाळे - माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर - माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे - माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ
VIDEO - दादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय काय घेतला? अजित गव्हाणेंनी सांगितलं कारण