Pune Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका ठेवत पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस (Pune Police) कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. 


आरोपी फरार झाल्याने कारवाई 


ससून रुग्णालयातून शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ हिला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. दरम्यान, हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघे ही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते. याच 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखवालीतून मार्शल लीलाकर या आरोपीने पळ काढला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 


पोलीस दलातील 3 जण दोषी 


दुसऱ्या प्रकरणात, पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील 3 जण दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणारे एक अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. 


स्वाती मोहोळ धमकी प्रकरण नेमकं काय?


शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर (Munna Polekar) याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या . सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. हाच आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rahul Gandhi : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांविरोधात दिल्लीत 'तटबंदी' सुरु; राहुल गांधींनी किमान हमीभावावर केली मोठी घोषणा