पुणे: पुण्यातील नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. त्या मृतदेहाचे (Pune Crime News) गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खानची हत्या केली आणि घरात धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर पुण्यात खूप पाऊस होता त्या दिवशी संगमवाडी येथील नदीपात्रात (Pune Crime News)फेकून दिले. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली. 


मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि वहिनी तीला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तीची हत्या (Pune Crime News) करण्यात आली आहे. 


या प्रकरणात पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दिसून येत आहे. 26 ऑगस्ट रोजी शिर नसलेलं मृतदेह पुण्यातील मुठा नदीत वाहत आलं होतं. या प्रकरणाचा तपास अत्यंत काटेकोरपणे करत पुणे पोलिसांनी छडा लावला आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


26 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुळा मुठा नदीमध्ये शीर, हात-पाय नसलेल्या अवस्थेत महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मूळा मुठा नदी पत्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली होती. हा स्त्रीचा मृतदेह आहे. शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र मृतदेह पाण्यात आढळला होता.


ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शिवविच्छेदन करण्यात आले आहे. अंदाजे 50 ते 60 वयाच्या आसपासचा तो स्त्री जातीचा मृतदेह होता. चंदन नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोधल्या गेल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह सापडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर मृत्यू झाला होता. याचा सखोल तपास केल्यानंतर हा मृतदेह कोणाचा आहे, हा खून का झाला याची सखोल माहिती समोर आली आहे.


हत्या का झाली?


पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि वहिनी तीला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तीची हत्या (Pune Crime News) करण्यात आली आहे.