पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला विजयस्तंभ अभिवादन समारंभात हिंसाचार झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊन नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांनी कंबर कसली आहे. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या यंदा यावेळी वाढेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारीही केली आहे.


कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय पोलीसांकडून 744 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट करण्यात आलेत. महसूल प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित केली आहे.

हेही वाचा - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस घेणार अमेरिकेच्या FBIची मदत

पोलिसांनी आतापर्यंत 744 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. 'टिकटॉक'वरून तेढ वाढवणारे 25 व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. तसेच 12 फेसबुकची पेजेस बंद करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2020 ला परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच आठवडा बाजारही बंद राहणार आहे. पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. विजस्तंभावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिस घेणार FBI ची मदत -
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा राव या तेलगु कवीच्या घरातुन कॉम्पुटर हार्डडिस्क हस्तगत करण्यात आली होती. या हार्डडिस्कमध्ये काय माहिती होती हे जाणून घेण्यासाठी पुणे पोलिस एफबीआयची मदत घेण्यार आहेत. त्यासाठी ही हार्डडिस्क अमेरिकेतील एफबीआय या तपास यंत्रणेकडे पुणे पोलिस पाठवणार आहेत. एफबीआय(Federal Bureau of Investigation)या अमेरिकन तपास यंत्रणेने त्याला संमती दिली आहे की नाही हे मात्र अजुनही समुज शकलेले नाही.

हेही वाचा - संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी

Koregaon Bhima | कोरेगाव-भीमा हिंसाचारावर एफबीआयची मदत घेणार | ABP Majha