अजित पवार यांचे स्वीयसहाय्यक सुनील मुसळे यांच्या मुलाचे रिसेप्शन आहे. तिथं अजित पवार उपस्थित दर्शवतील. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर फायनल झाली आहे. 30 डिसेंबरला दुपारी विधानभवन परिसरात एकूण 36 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
अजित पवारचं उपमुख्यमंत्री होणार -
अजित पवार यांनी भाजपशी घरोबा करत राज्यात सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरकार 80 तासांमध्ये पडले आणि अजित पवार यांची घरवापसी झाली. मात्र, बंड केल्यामुळे त्यांचं पक्षातील वजन कमी झाल्याने उपमुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून दूर गेल्याची चर्चा होती. दरम्यान, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप न झाल्याने सस्पेन्स वाढला होता. त्यातच सिंचन घोटाळ्यात एसीबीने क्लीन चिट दिल्यामुळे त्यांची इमेज सुधारण्यास मदत झाली होती. अशातच आता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यात येणार असल्याने अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री फिक्स मानले जात आहे.
अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री : संजय राऊत
अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लीन चीट मिळाल्याचा आनंदच आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत अशा अनुषंगाचं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर आता संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद कुणाला? अजित पवार, जयंत पाटील की वळसे पाटील, संभ्रम कायम
Ajit Pawar | अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये जागा बदलून गप्पा | ABP Majha