पुणे: आजच्या सोशल मिडीया (Social Media) आणि इंटरनेटच्या (Internet) दुनियेत रोज नवनव्या फसवणूकीच्या घटना समोर येताना दिसतात. अनेकदा सोशल मिडीया (Social Media) हॅक करून अनेकदा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना मदत म्हणून पैशांची मागणी केली जाते अशा घटना सामान्य नागरिकांसोबत रोजच घडतात मात्र, अशीच घटना पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तांच्या बाबतीत देखील घडली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आपल्या व्हॉट्सॲपला (Whatsapp) स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला (Whatsapp) स्टेटसमध्ये माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये अशी विनंती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी केली आहे.
आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर करून सोशल मिडीयवरून पैसे मागितले जात असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी केली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला (Whatsapp) स्टेटसमध्ये अशा गोष्टींना बळी न पडण्याचं आवाहन देखील केलं आहे.
अमितेश कुमार यांनी आपल्या स्टेटसमध्ये काय लिहलंय?
माझ्या फोटोचा वापर करून कोणातरी पैशांची मागणी करत आहे. कोणीही याला बळी पडू नका. पैसे देऊ नका किंवा अशा कोणत्याही रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नका.
सोशल मीडियाचा वापर करताना घ्या अशी काळजी
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन
सोशल मीडिया वापरताना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) हे सुरक्षा कवच आहे, ज्यामध्ये प्रवेश करणं सोपं नाहीये. हे अनेबल केल्यानंतर, तुमचा पासवर्ड हॅक झाला असला तरी, इतर ऑथेंटिकेशन असल्याशिवाय कोणीही तुमच्या अकाउंट कोणीही ओपण करू शकत नाही.
प्रायव्हसी सेटिंग्ज
सोशल मीडियावर तुमची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवणारा पहिला गार्ड तुमच्या फोनवर आणि त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेली प्रायव्हसी सेटिंग्ज आहे. वेळोवेळी आणि प्रत्येक अपडेटनंतर ही प्रायव्हसी सेटिंग्ज चेक करत रहा. त्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या पोस्ट कोण बघतं ते पहा? त्यानुसार सेटिंग बदला.