पुणे : पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केला होता. या घटनेची पुण्यासह राज्यभरात चर्चा झाली होती. पुण्यातील ससानेनगर भागात ही घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपींना पोलीस कधी अटक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. निहाल सिंग टाक यानं पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करत जखमी केलं होतं.या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना अटक केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल. 


वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड काल ससानेनगर भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना दोन मोटार सायकल चालकांमध्ये वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहाल सिंग टाकनं कोयत्यानं हल्ला केला होता. निहाल सिंग टाक या घटनेनंतर इतरांसह फरार झाला होता. पुण्यातील पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी याबाबत माहिती दिली होती.  


वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणात निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आलं होतं. यापूर्वी या आरोपींकडे पिस्तूल आढळलं होतं. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम राबवली होती.   
 
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना अखेर अटक केली. सोलापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांची केलेली अवस्था पाहून गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल.


साहेब मला लवकर बरं व्हायचंय


पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड जखमी झाले होते. या हल्ला प्रकरणानंतर रत्नदीप गायकवाड यांचा जखमी झालेला फोटा व्हायरल झाला आहे. रत्नदीप गायकवाड हे रुग्णालयात दाखल असून त्यांनी साहेब मला लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचं आहे, अशी भूमिका मांडली. 


दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षांनी देखील आक्रमक भूमिका मांडली होती. 


पाहा व्हिडीओ : 






इतर बातम्या :



Pune Police : धक्कादायक, पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला, रामटेकडी परिसरात खळबळजनक घटना