Pune Crime News:  पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune crime) शाखेच्या पथकाने चंदन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून अत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून पुष्पा गॅंगला (Pushpa Gang) बेड्या ठोकल्या आहेत. 


लहू तानाजी जाधव (वय 32), महादेव तानाजी जाधव (वय 30), हनुमंत रमेश जाधव (वय 30) आणि रामदास शहाजी माने (वय 28) असं आरोपींची नावे आहेत. या गँग ने पुणे शहरातील दत्तवाडी, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी उत्तम नगर या भागात चोरी केल्याचे तपासातून समोर आलं आहे.


एनडीए आणि सहकार नगर परिसरात एका शाळेच्या आवारात झालेल्या चंदन चोरीचा तपासा दरम्यान यातील एकाला अटक झाली होती. चोरलेले चंदनाचे हे झाड त्याने दुसऱ्यांना विकले होते.उत्तम नगर परिसरातील चंदन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यातील आरोपींकडे विचारपूस केली असता सगळ्या आरोपींची माहिती मिळाली होती. हे सर्वजण सिंहगड रस्त्यावर थांबले असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांनाही ताब्यात घेतले.


या टोळीच्या मार्गावर पोलीस होते. पोलिस या प्रकरणाला शोध घेत होते मात्र ते सापडला नाही. त्याच्या घराची झडती घेतली असता  85 किलो वजनाचे चंदनाचे लाकूड आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करुन उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला. दरम्य़ान चंदनाची चोरी करणारे पु.लं. देशपांडे उद्यानाजवळ (P.L. Deshpande Park) उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चंदनाचे झाड कापण्यासाठी लागणारे 3 वाकस, गिरमिट, कुऱ्हाड, रिकामी पोती असा मुद्देमाल जप्त केला आहे.


विविध परिसरातील हद्दीत केली होती झाडाची चोरी
आरोपींनी दत्तवाडी, डेक्कन , बंडगार्डन, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे उघड झाले आहे. या सगळ्या ठिकाणी या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अनेकदा या टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.