Pune Crime News: पैशांच्या मोबदल्यात जागेचा ताबा देतो असं सांगत पुण्यात व्यवसायिकाची मोठी (pune froud) फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 44 लाख 20 हजार 118 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाच्या जागेच्या मोबदल्यात पैसे देतो असं व्यावसायिकाला सांगण्यात आलं होतं. मात्र ना जागेचा ताबा दिला ना पैसे त्यामुळे व्यावसायिकाने थेट पोलिसांत धाव घेतली आहे. 33 वर्षीय कुंदन काटकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.


नोव्हेंबर 2016 मध्ये हा प्रकार घडला होता. सगळा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी चौकशी केली आणि आचल डेव्हलपर्सचे मालक अमित कलाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी हा व्यवहार झाला होता. प्लॉटिंग डेव्हलपमेंटमधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात पैसे देतो असं व्यावसायिकाने सांगितलं होतं.  त्यासाठी 44 लाख 20 हजार 118 रुपये कस्टमड्युटीसह देणे होते. मात्र पैसे न देता कलाटे यांनी काटकर यांना कासारसाईजवळील साडे सहा गुंठे जागा दाखवली. पैसे न  देता जागेचा ताबा देतो असं सांगितलं. मात्र या व्यवहारात कलाटे यांची फसवणूक करण्यात आली. जागेचा ताबा दिला आणि पैसेही दिले नाहीत, असं तक्रारीत कलाटे यांनी म्हटलं आहे. 


पुण्यात अनेक ठिकाणी डेव्हलपर्सकडून फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी  डेव्हलपमेंट किंवा गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोक पुढाकार घेतात. त्यात गुंतवणूक करतात. वाकड, हिंजवडी, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठे डेव्हलपर्स लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे जागेचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो. त्यात अशा प्रकराच्या फसवणूकदेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.


अनेक प्रकारे पैशाची फसवणूक झाल्याच्या घटना रोज घडतात. यात अनेक प्रकारचं आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गुंतवणुकीचे आमिष दाखवून मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींविरुद्ध पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 6 आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील आरोपींकडून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली होती. पुण्यातील कंपनीत गुंतवणूक करा, पैसे दुप्पट करुन देतो असं या मुकबंधिराकडून सांगण्यात येत होतं. मुकबधीरांनी फसवणूक केल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती.