पुणे: पुण्यातील चेन स्नॅचिंगच्या 59 गुन्ह्यातील फरारी आरोपीला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलं आहे. मम्मू ऊर्फ मोहम्मद अली उर्फ अजिज इराणी असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे.


या चेन स्नॅचरकडून पोलिसांनी 7 लाख 83 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. लोणी काळभोर येथील हा आरोपी ओदिशातील असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ओदिशातून अटक करुन पुण्यात आणलं.

59 चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली असून आता पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. या कारवाईत कोथरूड, अलंकार, वाकड, मार्केटयार्ड, सांगवी, शिवाजीनगर, विश्रामबाग, सिंहगडरोड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.