पुणे :  पिंपरी-चिंचवड सह आसपासच्या परिसरात 14 एप्रिल 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत असून, शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML Bus) उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्याचं जाहीर केलं आहे.


पुणे स्थानकाजवळील बोल्हाई चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुणे स्टेशन आगर जे. एन. बसस्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बसस्थानकातून पर्यायी मार्गाने बसेस वळविण्यात येणार आहेत. विशेषत: नेहरू मेमोरियल हॉल, अलंकार चौक आणि पुणे स्टेशन आगर जे. एन. बसस्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी या मार्गबदलाची माहिती ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 


-29, 148, 148A आणि 201 हे बसमार्ग साधू वासवानी चौक आणि अलंकार चौकमार्गे वळविण्यात येणार आहेत.


-बस मार्ग 3, 5, 6, 39, 57, 140, 140 A आणि 141 आपले नियमित वेळापत्रक कायम ठेवतील, परंतु नरपतगिरी चौक किंवा 
लाल देऊळ मार्गे पुणे स्टेशन किंवा केईएम रुग्णालयाकडे जातील.


-बस मार्ग क्रमांक 24, 24 A, 31, 235 आणि 236 हे नरपतगिरी चौक किंवा केईएम हॉस्पिटल चौकमार्गे पुणे स्थानकाकडे नेहमीच्या मार्गाने जातील.


-बसमार्ग क्रमांक 8, 81, 94, 108, 143, 144, 144A, 144 K आणि 283 नरपतगिरी चौक किंवा केईएम हॉस्पिटल चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जातील.


-बस मार्ग क्रमांक 143, 145 आणि 146 जे.एन.पेटीइस्टेट बसस्टॉपमार्गे पुणे स्थानकाकडे जातील.


-बस मार्ग 86, 98, 102, 131, 132, 133, 133 A, 135, 137, 147, 157, 159, 159 B, 162, 163, 165, 169, 234 आणि 237 जुने बाजार, गदिताल चौक आणि लाल देऊळ मार्गे जातील.


-बस मार्ग क्रमांक 112, 139, 139 A, 160, 168, 175, 182, 204, 208 आणि मेट्रो शटल 17 हडपसर किंवा मुंढवा गावातून एम.एन.पी.ए. बिल्डिंग, चिंचवड आणि निगडी पर्यंत जातील.


-बसमार्ग क्रमांक 170, 172, 177, 186, 187 आणि 203 जे. एन. पेटीट स्टेशन ते साधू वासवानी चौक या मार्गावर धावणार आहेत.


-बस मार्ग क्रमांक 9 व 174 जे. एन. पेटीट स्थानकातून त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुटतील.


-बस मार्ग 151, 154, 155, 163, 166 आणि 315 सकाळपासून जे. एन. पेटीट स्टेशनपर्यंत सामान्यपणे धावतील.


-बस मार्ग 115, 225, 317, 325, 333, 348 आणि 357 जे. एन. पेटीट येथे थांबा देऊन त्यांच्या नेहमीच्या मार्गांचे अनुसरण करतील.


-बस मार्ग 311, 312 आणि 366 पॉवर हाऊस रोडमार्गे त्यांचे नियमित मार्ग कायम ठेवतील.


इतर महत्वाची बातमी-


baramati Crime : बारामती हादरलं!  बारामतीत भरदिवसा दांपत्याचा खून; स्वसंपाक घरात आढळला मृतदेह


Loksabha Election 2024 : संजय मंडलिक आता करवीर नगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सुद्धा थेट वारसदार नाहीत म्हणणार का?




.