पुणे :  ओला-उबेर सारख्या मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सींबाबत पुण्यात भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला  ठरला आहे. मोबाईल अॅपवरील टॅक्सींच्या मनमानी भाडेआकारणीला चाप बसणार आहे. पुण्यातील कॅबचे दर (Pune Cab Rate)  निश्चित करण्यास आर टी ओ (Pune RTO)  आणि कॅब संघटनांच्या बेठकीत मान्यता देण्यात आली आहे.  या बैठकीत ठरविण्यात असलेल्या दरांवर  ओला- उबर (Ola- Uber)  सारख्या कंपन्या त्यांचे कमिशन लावतील आणि त्यानंतर कॅब चे दर निश्चित होणार आहे.  रिक्षामधे मात्र कोणताही भाडेवाढ होणार नाही. पुणे RTO येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर  यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा संघटना, कॅब संघटना व ग्राहक मंच यांची बैठक झाली. 


मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सीमध्ये ओला उबेरची मक्तेदारी आणि मनमानी कारभार खपवून घेणार नाही. समाजाच्या हितासाठी लवकरच ओला आणि उबेरसारख्या टॅक्सींवरही लगाम लावणार असल्याचं राज्य सरकारनं यापूर्वी हायकोर्टात स्पष्ट केलं होतं.शहरी भागांत प्रवाश्यांची नेआण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना असणं बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रवाश्यांकडून भाडं वसूल करताना ते प्रमाणित  असणं बंधनकारक आहे. त्यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्यावेळी एक आणि इतर वेळ एक अश्याप्रकारे प्रवाश्यांकडून होणारी भाडेवसूली गैर असून त्यावर लवकरच राज्य सरकारकडून नियंत्रण आणणयासठी हे पाऊल उचलले आहे.अॅपधारक टॅक्सी चालकांना त्यांच्यावर कुणाचच बंधन नकोय. मात्र, ते शक्य नाही, कारण ओला-उबेर मोबाईल अॅपवर जरी आधारीत असल्या तरी त्या राज्य परिवहन विभागाच्या अखत्यारीत आहेत असही राज्य सरकारनं याआधी स्पष्ट केलंय


सदर बैठकीमध्ये कॅब चे दर खातुआ समितीनुसर खालीलप्रमाणे ठरवण्यात आले. 


1) नॉन AC कॅब - पहिल्या 1.5km साठी/ 31 rs


2) नॉन AC कॅब पुढील प्रत्येक 1km साठी / 21 rs


AC कॅब साठी वरील दरामध्ये अतिरिक्त 25% रुपये लागतील. 


पहिले 1.5km / 39rs  नंतर प्रति km  / 26


यानंतर RTA बैठकीत सदर दरास मान्यता मिळाल्यानंतर सदर रेट लागू होतील.


 पुणे पिंपरीत ई-कॅब सेवा  


पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये विशिष्ट अंतरासाठी प्रवाशांना ई-कॅब सेवा देण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. यासाठी 30 टक्के महिला चालक असणार आहे.  पहिल्या टप्प्यात 100 ते 200 मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल आहे. सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहेत. 


हे ही वाचा :


Ola-Uber मध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण! महिलांच्या सुरक्षेसाठी यूपी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कधी?