नागपूर : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session) उपस्थित राहण्यास गृह विभागाकडून सांगण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे हे नागपुरात पोहचलेत. विरोधकांनी ललित पाटील प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 


राज्य सरकारमधील दोन मंत्री हे ललित पाटीलला मदत करत असल्याचा विरोधकांचा दावा आहे. या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाष्य करणार असल्याची माहिती देण्यात आलीये. त्याचसाठी तपास अधिकाऱ्यांना बोलावण्यात आल्याचं म्हटलं जातंय. ललित पाटील प्रकरणात राज्यातील काही मंत्री आणि पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची नावे असल्याचा दावा देखील विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे या अनुषांगाने देखील या प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता आहे. 


ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी


ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून (Pune Police)  आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ज्या डॉक्टरांनी ललित पाटील यांच्यावर उपचार केले त्यांची सखोल चौकशी आणि जबाब पोलिसांनी  नोंदवून घेतले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी  चौकशी केली. ललित पाटील पलायन प्रकरणी ससूनमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे.


प्रकरण नेमकं काय?


ड्रग माफिया ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातील (Sasoon Hospital Drug Racket) कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डमधे उपचारांच्या नावाखाली बंद होता. याच ठिकाणी रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना अटकेत होता. विनय अरहाना याच्यावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातुन विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.  


ललित पाटील ससुन रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला आणि तिथून सोमवार पेठेत पोहचला. तिथे विनय अरहाना याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा कार घेऊन तयार होता. दत्ता डोकेने ललित पाटीलला पुण्याच्या बाहेर रावेतपर्यंत सोडले आणि स्वतः जवळचे दहा हजार रुपये देखील ललितला दिले. हे सगळे त्याने विनय अरहानाच्या सांगण्यावरून केले.


हेही वाचा :


Gadchiroli News : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू कारखान्याला परवानगी; डॉ. बंग यांचा सरकारवर खळबळजनक आरोप