पुणे : बंगळुरू बॉम्बस्फोट (Bangluru Bomb Blast) प्रकरणात आणखी नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता या बॉम्बस्फोटाचं (Bomb Blast) पुणे कनेक्शन समोर आलं आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणणारा संशयित दहशतवादी (Terrorist )पुण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. NIA ने हा संशय व्यक्त केला असून त्यांचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. एनआयएकडून पुण्यातील कोंढवा भागात या संशयीताचा शोध घेण्यात आला. मात्र कोढंव्यातील कोणत्या इमारतीत हा शोध घेण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वी अनेक दहशतवादी पुण्यातील कोंढवा परिसरात सापडले आहेत. त्यामुळे हा आरोपी पुण्यात आल्याचा संशय NIA ला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला, त्यानंतर बस बदलून तो गोकर्णमार्गे पुण्यात आल्याचा संशय आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील ब्रूकफील्ड या उच्चभ्रू परिसरातील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 10 व्यक्ती जखमी झाले होते. त्या स्फोटाचा तपास NIA कडून सुरु करण्यात आला. पुण्यात नेमका कोणत्या इमारतीत NIA तपास करत आहे. याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही आहे.
सीसीटीव्ही फुटेज समोर
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट मोठ्या नियोजनाने करण्यात आला होता. दहशतवादी स्फोट घडवूनही आरोपीला कोणतीही घाई नव्हती आणि तो थंड डोक्याने बाहेर पडत होता. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाला एक आठवडा उलटून गेला तरी आरोपीला पकडण्यात अद्यापही यश आलेलं नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. त्यात काही सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर येत आहे. त्यात स्फोटा घडवून आणण्यापूर्वी संशयित रामेश्वरम कॅफेमधून सकाळी 11:43 वाजता IED ठेवून निघून गेला. काही मिनिटांनंतर, BMTC बसमध्ये चढला. इथे त्याने फुल स्लीव्ह शर्ट आणि लाइट कॉलरची पोलो कॅप, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसत होता. त्यानंतर जांभळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट आणि काळी टोपी घातली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.
NIA कडून आरोपीचा शोध सुरु
हे सगळे सीसीटीव्ही आणि पुण्यातील सीसीटीव्हीपाहून NIA आरोपीचा शोध घेत आहे. यापूर्वी पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवादी सापडले होते. या आरोपीचा शोध देखील याच परिसरात सुरु आहे. या आरोपीचा शोध घेतल्यानंतर पुण्यात सापडलेल्या दहशतावाद्यांशी काही कनेक्शन आहे का? याचा शोध NIA कडून घेतला जाणार आहे.
इतर महत्वाची बातमी-