पुणे : मागील काही दिवसांपासून (Baramati News) चर्चेत असलेल्या नणंद- भावजय म्हणजे सुप्रिया सुळे (Supriya Sule)आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या पुन्हा एकदा गळाभेटीमुळे चर्चेत आल्या. एकमेकांविरुद्ध लोकसभा निवडणूक (Baramati Loksabha 2024 ) लढवण्याच्या तयारीत असलेल्या दोघींची महाशिवरात्रीनिमित्त जळोची काळेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता दोघी आमोरा समोर आल्या आणि त्यांनी हसत गळाभेट घेतली. यानंतर राजकीय चर्चा रंगली आणि अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या. याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार माझ्या भावाची बायको आहे माझ्या मोठ्या वहिनी आहेत. त्यांचा मान मी त्यांना दिला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज बारामतीत जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


या गळाभेटीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी आदर आणि सन्मानाने सुनेत्रा वहिनींची गळाभेट घेतली. सुनेत्रा पवार माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत.  आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीला आपण आदर देणं हे माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आहेत. माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले त्याप्रमाणे मी वागते. 


ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका लढवणार?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका कशा लढवायच्या ते आमचे वरिष्ठ ठरवतील. मात्र विधानसभा आणि लोकसभा याच्यात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


दोन्ही पवार मैदानात!


बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळेया गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत. त्यात या नणंद भाजवज एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरणार आहेत तर शरद पवार लेक सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले आहेत.


इतर महत्वाची बातमी-


Baramati And Shirur Loksabha : अजित पवार गटाला एक अंकी जागा; बारामती, शिरुरमध्ये अजित पवारांचे 'दावेदार' कोण?