Pune Rains: नीरा नदीच्या खोऱ्यात सध्या पावसाची संततधार सुरु असून आज वीर धरणातून (Vir Dam) ३२ हजार ४५९ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून (Pune Rains)  पुण्यात अतिवृष्टीची नोंद होत आहे. दरम्यान, पुण्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान पुण्यातील पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून हा विसर्ग करण्यात आला आहे.


सध्या नीरा खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरु असल्याने या खोऱ्यातील वीर धरण 85 टक्के भरल्याने येथूनही पाणी सोडले जाणार आहे. भाटघर 67 टक्के, नीरा देवघर 60 टक्के आणि गुंजवणी 71 टक्के भरले आहे. वीर धरणातून आता पाणी सोडण्याचा इशारा दिला असून याचा उजनीला काही फायदा होत नसला तरी हे पाणी चंद्रभागेत येत असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. 


वीर धरणपरिसरात पावसाची संततधार


पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून  जनजीवन विस्कळीत झाली आहे.  पुण्यात  (Pune Rain Update)  रात्रभर मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून (Khadkwasla Dam)   झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुण्यात पुरंदर तालुक्यातील वीर धरण परिसरात पावसाची संततधार असून आता या धरणातून विसर्ग सोडण्यात आला असून भीमा आणि नीरा नदीपरिसरातील गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.


पुणे जिल्ह्यातील सर्वत धरणात चांगला पाणीसाठा


सध्या नीरा खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरु असल्याने या खोऱ्यातील वीर धरण 85 टक्के भरल्याने येथूनही पाणी सोडले जाणार आहे. भाटघर 67 टक्के, नीरा देवघर 60 टक्के आणि गुंजवणी 71 टक्के भरले आहे. वीर धरणातून आता पाणी सोडण्याचा इशारा दिला असून याचा उजनीला काही फायदा होत नसला तरी हे पाणी चंद्रभागेत येत असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. सध्या गेल्या चार दिवसापासून पंढरपूर परिसरातही मुसळधार पाऊस पडत असल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. यंदा या पावसामुळे चंद्रभागेत इतके पाणी होते की आषाढी यात्रेतही  भाविकांच्या स्नानासाठी उजनी धरणातून पाणी सोडावे लागले नव्हते. उजनी धरणावर अनेक शहरे आणि गावांच्या पाणीपुरवठा योजनांसोबत हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून असल्याने उजनीत वाढत असलेला पाणीसाठा ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी ठरत आहे.


उजनी धरणात विसर्ग


पुणे जिल्हा (Pune District) आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं सध्या उजनी धरणात 69 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. थोड्याच वेळात पाण्याचा विसर्ग हा 1 लाखाच्या पुढे जाणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 40 हजार , वडिवले धरणातून 8270 तर कासारसाई धरणातून 4500 क्युसेकस्ने विसर्ग सुरु आहे. पावसाच्या पाण्यासोबत या धरणाचे पाणीही उजनी धरणाकडे येत आहे.