पुणे: जुन्नर शहरातील इदगाह मैदाना लगतच्या शेततळ्यात बुडून दोन सख्या भाऊ-बहिणीचा (Tragic incident in Junnar) मृत्यू झाल्याची हृदयद्रावक (Tragic incident in Junnar) घटना उघडकीस आली आहे. आफान अफसर इनामदार (१०) आणि रिफत अफसर इनामदार (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर येथील रहिवासी होते.(Tragic incident in Junnar)
शनिवारी दुपारी चार वाजल्यानंतर ही दोन्ही मुले घराबाहेर गेली होती. परंतु बराच वेळ झाला तरी ती परतली नाहीत, हे त्यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ जुन्नर पोलिसांना (Tragic incident in Junnar) माहिती दिली. मुलांचे खेळण्याचे नेहमीचे ठिकाणेही तपासली गेली, पण तेथेही त्यांचा मागमूस मिळाला नाही. विशेष म्हणजे, या भागात बिबट्याचा वावर असल्याने पोलिसांसह वनविभागाचे पथकही शोधमोहीमेसाठी तैनात करण्यात आले.(Tragic incident in Junnar)
ड्रोनच्या मदतीने शोध घेत असताना शेततळ्याच्या काठावर मुलांचे चप्पल-बूट पडलेले आढळले. त्यानंतर तळ्यात शोध घेतला असता रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही भावंडांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. परिसरात या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, तर पुढील तपास जुन्नर पोलिसांकडून सुरू आहे.(Tragic incident in Junnar)
Pune News: खेळायला गेलेले परत आलेच नाहीत...
आफान अफसर इनामदार(वय १० वर्षे) आणि रिफत अफसर इनामदार(वय ७ वर्षे) रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर अशी या भावंडांची नावे आहेत. काल (शनिवारी, ता 22) ही दोन्ही भावंडे दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले होते. दरम्यान ते ज्या ठिकाणी खेळायला जायचे तिथेही दिसून न आल्याने त्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने, पोलिस पथकासह वनविभागाचे पथक देखील येथे आले. ड्रोनच्या सहाय्याने या दोन्ही भावंडांचा शोध घेण्यात येत असताना, शेततळ्याच्या काठावर लहान मुलांचे बूट-चप्पल आढळून आल्याने तळ्यात शोध घेतला असता, साडेनऊच्या सुमारास ही मुले पाण्यात बुडाल्याचे आढळून आले.