Leopard Attack पुणे : राज्यभरातील अनेक ठिकाणी बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला असुन शहरात वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. अशातचह आता पुणे जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातील निमगाव येथून देखील बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. खेडच्या भोंडवेवस्तीत शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला आहे.
शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. तर बिबट्याच्या या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून या चिमुकल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. यश गणेश भोंडवे असे बिबट्याने हल्ला केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत जीव वाचला असून मोठी घटना टळली आहे. मात्र बिबट्यांच्या वावर आणि दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.
अस्वलाच्या हल्ल्यात दोन वनमजूर गंभीर तर, वनरक्षक किरकोळ जखमी; नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील घटना
व्याघ्र प्रकल्पात गस्तीवर असलेल्या वनमजूर आणि वनरक्षकावर झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलानं हल्ला केला. यात दोन वनमजूर गंभीर जखमी झाले असून वनरक्षक किरकोळ जखमी झाले. ही घटना नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा संकुल सहनक्षेत्रातील नियतक्षेत्र कपाळदेव मधील कक्ष क्रमांक 94 मध्ये घडली. माणिकराव चौधरी (52) आणि गणेश शहारे (50) असं अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनमजुरांची नावं आहेत. तर, शैलेश तंतरपाळे असं किरकोळ जखमी वनरक्षकाचं नावं आहे. दोन्ही गंभीर जखमी वनमजुरांवर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे. तर, वनरक्षक तंतरपाळे यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
Akola : अकोल्यात आढळलेला प्राणी बिबट्या नसल्याचा वनविभागाचा दावा! मात्र, पगमार्क आढळले अन्..
अकोला शहरातील न्यू तापडियानगर भागात पहाटे बिबट्या दिसल्याचा दावा प्रत्यक्षदराशी नागरिकांनी केला होता. मात्र, हा बिबट्या असल्याचं काल वनविभागाने नाकारलं होतंय. अखेर पगमार्क आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हा बिबट्याच असल्याचं वनविभागाने मान्य केलंय. त्यामूळे वनविभागाने आज दुसऱ्या दिवशी न्यू तापडिया नगर आणि उमरी भागात या बिबट्याची शोध मोहिम सुरू केलीय.
विलास बंकावार या पोलीस कर्मचार्याच्या घरात काल हा बिबट्या घुसला होता. बंकावार यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या त्यांच्या सासू पुष्पा तुम्मे यांना घरातील जिन्याच्या पायर्यांवर हा बिबट्या बसलेला दिसलाय़. त्यानंतर बिबट्याने जिन्याच्या खिडकीची तावदानं फोडत बाहेर उडी मारली होतीय. या घटनेनंतर या भागात वनविभाग आणि पोलीस दाखल झालेय. काल वनविभागाने हा प्राणी बिबट्या नसल्याचं म्हटलं होतंय. अखेर आज बिबट्याच्या खुणा आणि पगमार्क परिसरात आढळून आल्याने आज वनविभागाने या भागात शोधमोहिम सुरू केलीय. नागरिकांनी घाबरून जावू नये असं आवाहन वनविभागाने या भागातील रहिवाशांना केलंय.
आणखी वाचा