Pune bypoll election 2023 : चिंचवड विधानसभा  (chinchwad bypoll election)पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीकडून दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (supriya sule)व्यक्त केलं. मात्र बिनविरोध निवणुकीवरून मी तर्कवितर्क लावू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यात पुण्यात बोलत होत्या.


त्या पुढे म्हणाल्या,  महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. त्यातून सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांची उपस्थिती होती. पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक भेटीगाठी सुरु आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पोटनिवडणुकीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या. 


देवेंद्र पडणवीसांनी गुन्हेगारीवर तोडगा काढायला हवा...


महाविकासआघाडी सरकारने मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट केलं होतं, असा दावा फडणवीसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात करत खळबळ उडवून दिली होती. त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "आप से ये उम्मिद न थी", अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर काम करावं. पुण्यातील किंवा राज्यातील अनेक गुन्ह्यांबाबत चर्चा करायला हवी होती. त्यासोबतच त्यांनी गुन्ह्यांतं प्रमाण कसं कमी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग सक्रिय आहे. त्यांनी त्यावर तोडगा काढायला हवा शिवाय गोळीबाराच्या प्रकरणातदेखील वाढ झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही त्या म्हणाल्या.


स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग अभिमानास्पद...


पुण्याच्या आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करायला सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली आणि स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेतीदेखील होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासोबतच प्रत्येकाचं असलेलं शेतीसोबतच नातं जपण्यात येत आहे.ही चांगली बाब आहे. आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खासियत आहे. लोकसंख्या वाढत आहे. त्यासोबतच शहरांचादेखील विकास होत आहे. यामुळे शेतजमीन जगात , राज्यात कमी होत आहे. त्यामुळे असे अनेक अनोखे प्रयोग होणं गरजेचं आहे. या प्रयोगांना सगळ्यांनी प्रोत्साहनदेखील दिलं पाहिजे,असंही त्या म्हणाल्या. त्यासोबतच शेतकरी जगला पाहिजे. टिकला पाहिजे आणित्या शेतकऱ्याचा मानसन्मान झालाच पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.