Pune Bypoll Election 2023: सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे, ती म्हणजे, पुण्यातील (Pune News) कसबा (Kasba Peth Assembly Constituency) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad Assembly Constituency) पोटनिवडणूक (Maharashtra By-Election 2023) बिनविरोध होणार की नाही. कसबा मतदार संघातील (Kasba Peth By-Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघातील (Chinchwad By-Election) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) या भाजपच्या दोन्ही आमदारांचं निधन झाल्याामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर महाविकास आघाडी तिथं उमेदवार देणार, अशीही चर्चा सुरू आहे. अशातच काल महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीनंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे. 


शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांची काल (मंगळवारी) मातोश्रीवर बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, जयंत पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतरही पाच निवडणुकांबाबत रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. पण, या बैठकीला काँग्रेसकडून कुणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. 


पुण्यातील पोटनिवडणुकांबाबत बोलताना काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईतील माीतोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक पार पडली. बैठकीनंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.  


भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीनंही तयारी सुरु केली आहे. यावर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. तर, काही दिवसांपूर्वी दोन्ही जागांवर बिनविरोध पोटनिवडणूक होण्याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली होती. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांकडे लागल्या आहेत. आता ही निवडणूक बिनविरोध होणार की, महाविकास आघाडी आपला उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.