पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून (Pune Lok Sabha Constituency)  मुरलीधर मोहोळांना (Murlidhar Mohol)  उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता त्यांच्या उमेदवारीवर भाजचेच नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत पण उद्धव ठाकरेंची ताकद जास्त हे सर्वांना माहिती आहे, असा हल्लाबोल संजय काकडेंनी केला आहे. मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही. पण मी इच्छुक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.


दोनच दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळांनी संजय काकडेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अभिनंदन करत स्वागतपर सन्मान केला. प्रचार नियोजनासह विविध विषयांवर संवाद झाल्याचं मुरलीधर मोहोळांनी शोशल मीडियावर सांगितलं होतं. त्यानंतर मात्र आता संजय काकडेंनी मोहोळांच्या उमेदवारीवर नाराज व्यक्त केल आहे. मी उमेदीची दहा वर्ष पक्षाला दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवर मी नाराज आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छूक आहे आणि माझी नाराजी ही नैसर्गिक असल्याचं संजय काकडे म्हणाले. मात्र मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पूर्वीचा मित्र पक्ष शिवसेना आता भाजप सोबत नाही. आता एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप सोबत आहे पण उध्दव ठाकरे शिवसेनेची ताकद जास्त आहे सगळ्यांना माहिती असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 


पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील!


त्यासोबत त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पुणे लोकसभेचे वास्तव मांडले, असल्याचं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र माननीय श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली.यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक आणि केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे, असं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ आवडतात का ? विचारल्यावर धंगेकर थेटच बोलले, मला….