पुणे : रिक्षाचालक म्हंटल की बहुतांश नागरिकांच्या मनात अपवाद वगळता त्यांच्याबद्दल चांगली प्रतिमा नसते. त्याचे कारण सर्वश्रुत आहे. मात्र कोरोना काळात पुण्यातील एका रिक्षाचालकांने या प्रतिमेला छेद दिलाय. कोरोनाच्या काळात जीवाची परवा न करता, मोफत सेवा देत अनेकांसाठी तो देवदूत बनलाय.


पुण्यातील रिक्षाचालक संदीप काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून ते रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र गेल्या वर्षात आलेलं कोरोनाच्या संकटात अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आलेली असतांना संदीप यांनी कौतुकास्पद कामगिरी केलीय. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश लोकांना मोफत सेवा दिली आहे. वेळ प्रसंगी कोरोनाच्या रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याने कोरोनाला न घाबरता त्यांनी रुग्णांची मोफत सेवा केली. माणुसकीचा धर्माला आत्ता नाही जगायचं तर कधी जगायचं म्हणून संदीप यांनी मृत्यूनंतर आपले नाव लोकांनी चांगलं काढावे याकरीता दिवसरात्र ही सेवा आजवर सुरू ठेवली आहे. त्याचा त्यांना विशेष आनंद होतोय.


 कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन करण्यात आलं. प्रवासाच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं संदीप यांनी सेवा दिल्यानं त्यांचं कौतुक करताय. तर कोरोनाला काही जण न घाबरता माणुसकीचा हात दिल्यानं त्यांचे आभार मानायला देखील विसरत नाही.


 कोरोनाच्या काळात खरंतर अश्या माणुसकीचा हात आणि आधार देण्याची नितांत गरज आहे. हेच ओळखून तीन चाकावरचे संदीप यांनी सेवा करत अनेकांसाठी  देवदूत ठरलेय. त्यामुळे या संकटकाळात  तुम्ही आम्ही देखील माणुसकी जपण्याची गरज आहे.