पुणे : स्वप्न फक्त बघायचीच नसतात (Pune news) तर ती स्वप्न पूर्ण करायची असतात. परिस्थिती कशीही असो किंवा काळ कसाही असो मात्र इच्छाशक्ती असेल तर माणूस सगळी स्वप्न पूर्ण करु शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील (farmer) शेतकरी रोहिदास नवघणे (Rohidas Navaghne Farmer) आहे. सगळ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या स्वप्नातली विंटेज कार तयार केली आहे. सगळ्या पंतक्रोशीत सध्या त्यांच्या या विंटेज कारची जोरदार चर्चा रंगली आहे. एखाद्या कार डिझायनर किंवा इंजिनिअरला लाजवणारी ही विंटेज कार चांगलीच भाव खाऊन जात आहे. 


रोहिदास नवघणे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेतकरी आहेत. त्यांचं फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीसा फिरायला गेल्यावर रोहिदास यांना भरपूर प्रकारच्या कार दिसल्या. त्यावेळी त्यांनी आपण अशी कार तयार करायची,असं ठरवलं. मावळमध्ये परतल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी जमा केल्या. त्यात गाडीसाठी लागणाऱ्या काही गोष्टींचा शोध देखील घेतला. त्यात भंगारातील साहित्याचादेखील समावेश होता. काही साहित्य रोहिदास यांना विकत घ्यावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक ईन इंडिया या संकल्पनेतून ही कार साकारण्यात आली आहे. 


भारतीय बनावटीची ही विंटेज कार ई व्हेईकल आहे. एकदा चार्ज केली की तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते. टाकाऊपासून टिकाऊचा हा अफलातून जुगाड करत आलिशान विंटेज कार तयार केली आहे. सध्या बाजारात मोठमोठ्या विंटेंज कार उपलब्ध आहे. त्याशिवाय ई-कारदेखील उपलब्ध आहे. मात्र या कारची किंमत सामान्यांना झेपणारी नाही आणि शेतकऱ्यांना तर अजिबाज झेपणारी नाही. त्यामुळे रोहिदास यांनी घरीच ही कार तयार केली आहे. 


ही कार तयार करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्केच किंवा आकृती तयार केली नव्हती. पाच ते सहा तास ही कार चार्ज केल्यास 100 किलोमीटर चालू शकते. अडीच लाखात ही कार रोहिदास यांनी तयार केली आहे. मात्र पुढे जर ही कार बाजारात आणायची असेल तर त्यासाठी पेटंटची गरज आहे. त्यासाठी रोहिदार प्रयत्न करत आहे. शेतकरी फक्त पारंपारिक शेतीला आदुनिक शेतीत रुपांतर करु शकत नाही तर ईच्छाशक्ती असली तर विंटेज कारदेखील बनवू शकतो, याचं रोहिदास हे उत्तम उदाहरण आहे. 


इतर महत्वाची बातमी-


एक, दोन नाही, तर तब्बल 5 ईमेल; मुकेश अंबानींना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र सुरूच, पोलिसांच्या हाती अद्याप काहीच नाही