पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून भयंकर (Pune news) प्रकार समोर येत आहे. एकीकडे डासांचं प्रकरण समोर असतानाच दुसरीकडे वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये (Pollution) लाल अळ्या सापडल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील हा प्रकार आहे. हिंजवडीतील एका रहिवाश्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या दिसत आहे. हा प्रकार पाहून आयटी हबमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जयदीप बाफना नावाच्या एक्स या अकांऊटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 15 फेब्रुवारीला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापदेखील व्यक्त करत आहे.
ट्विटमध्ये नेमकं काय आहे?
ही Chironomid larvae आहे, Chironomid एक भाग आहे. ज्याला सामान्यत: प्रौढ अवस्थेत "नॉन-चावणारे मिज" आणि लार्वा अवस्थेत "bloodworms" म्हणतात. हे डास जर वाकड आणि हिंजवडी परिसरातील नदीतून येत असेल तर नदी प्रदुषित झाली आहे. या अळीचा लालरंग हा खराब पाण्याची गुणवत्ता दर्शवतं. हा फक्त एका घरातील प्रश्न नसून 800 फ्लॅटपैकी किमान 20 टक्के घरातील नळाच्या पाण्यात सापडले आहे, हे घातक असल्याचं जयदीप बाफना यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
या सगळ्या धोकादायक घटना घडत असताना पुणे महापालिका नदी सुधार प्रकल्पाकडे लक्ष देत आहे. हे प्रोजेक्ट वातावरण खराब करणारे आहे. याकडे मात्र पालिकेने दुर्लक्ष केलं आहे. त्यासोबतच नदीकाठचे आरएफडी, सांडपाणी, ड्रेनेज, कचरा, जलकुंभ, डास, मलेरिया, डेंग्यू व इतर असंख्य समस्यांचा नाश रोखण्यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप ट्विटमधून करण्यात आला आहे.
पुण्यातील हिंजवडी परिसरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यात अनेक सोसायट्यांना पाणी नदी किंवा विहिरीतून दिलं जातं. मात्र या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जानेवारी आणि फेब्रुवारी हा काळ किडकांसाठी पोषक असतो. त्याच्या प्रजननाचा काळ असतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-