पिंपरीच चिंचवड, पुणे : पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या  (PCMC School)शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका आठवीतील विद्यार्थ्याचा(Student) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे असं या आठवीतील मुलाचं नाव होतं. त्याच्या अचानक जाण्याने कांबळे कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यात सार्थकचे शेवटचे शब्द सांगताना त्यांच्या वडिलांनी हंबरडा फोडला आहे. शाळेत जाताना पप्पा संध्याकाळी लवकर या आणि जिन्यात लाईट नाही त्यामुळे जाताना नीट जा, हे त्याचे शेवटचे शब्द सांगताना कांबळे घराचे कर्ताधर्ता असलेल्या वडिलांनी मात्र मुलाच्या मृत्यूनं टाहो फोडला. 


आठवीत शिकत असणारा सार्थक रोजच्या प्रमाणे सकाळी उठून आवरुन आई-वडिलांशी बोलून शाळेत गेला. शाळेत जाताना पप्पा संध्याकाळी लवकर या आणि येता-जाता पायऱ्यावरुन नीट जा, असं सांगून शाळेत गेला मात्र दुर्दैवानं घरी परतलाच नाही. वडिलांना लवकर या सांगून गेलेला सार्थकला घेण्यासाठी वडिलांना थेट दवाखाना गाठावा लागला. 


तोल गेला अन् थेट डक्टमध्ये पडला!


शाळेत गेलेला सार्थक साधारण दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. मात्र याच रेलिंगनं त्याचा जीव घेतला. तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र सार्थकनं तो ऐकला नाही. अचानकपणे रेलिंगवरुन त्याचा तोल गेला आणि तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. या अपघातात त्यानं  जीव गमावला. 


हे कळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं. एका शिक्षिकेने वडिलांना फोन करुन थेट दवाखान्यात बोलवलं. मुलगा जखमी झाला आहे. तुम्ही थेट दवाखान्यात पोहचा, असा फोन आल्यानं वडिलांना धक्का बसला आणि वडिल आहे त्या अवस्थेत थेट दवाखान्यात पोहचले. मात्र तोपर्यंत सार्थकचा मृत्यू झाला होता. 


शाळेवर कारवाई होईल पण मुलाचं काय?


सकाळी हसत खेळत घरातून शाळेत गेलेला सार्थक जगातच राहिला नाही हे ऐकून वडिलांसह कुटुंबियांना धक्का बसला. वडिलांनी थेट शाळा गाठली आणि शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर माझा मुलगा मला काहीही करुन पर द्या, म्हणत टाहो फोडला. त्यानंतर या शाळेची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. या शाळेची आता चौकशी करुन शाळेवर योग्य कारवाई करण्यात येईल मात्र कांबळेंच्या कुटुंबातील हसतं खेळतं वातावरण परत येणार नाही. वडिलांसोबतच सार्थकच्या आईला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Sunetra Pawar Baramati Loksabha : बारामतीत नणंद-भावजय तगडी लढत? सुनेत्रा पवारांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी, शहरात विकासरथ तयार