पुणे : पुण्यात सध्या पाळीव प्राण्यांच्या (Pune Crime News)  संदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहे. त्यातच शेजाऱ्या कुत्रा सारखा भुंकतो आणि त्रास देतो अस म्हणत पुण्यातील हडपसर भागात एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर  स्पोर्ट्स गनमधून गोळीबार केला. कुत्राच्या मालकाने त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडलीय. कुत्रा नेहमी त्रास देतो, या कारणावरून त्यास एअरगनचा छऱ्या मारून जखमी केले. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे


या प्रकरणी प्रीती विकास अग्रवाल (वय 46, किरण इनक्लेव्ह, लोकमंगल सोसायटी, मांजरी बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांनी एक कुत्रा पाळलेला होता. तिचे नावबाऊंसी असे आहे. 21 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुत्रा सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. यावेळी आरोपी त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने  गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा झाली. यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून तो विकलांगदेखील झाला आहे. 


सोसायटीत कुत्रा घुसल्याने विष पाजून घेतला जीव...


काहीच दिवसांपूर्वी एका कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी तक्रार दाखल करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमीर खान (23) यांनी कोंढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुत्र्याचा वेदनांनी रडण्याचा आवाज ऐकला. तो त्वरीत बाल्कनीकडे धावला जिथे त्याला काही लोक लाठी मारताना दिसले होते, असा दावा खान यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. कुत्र्याला सोसायटीच्या मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ते हा प्रकार करत आहेत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. कुत्र्याला मारहाण करु नका असं खान आणि त्याच्या आईने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र चौघेही यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर खान आणि त्याच्या आईने या घृणास्पद कृत्याची नोंद केली आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी संपर्क साधला. थोड्याच वेळात, एक प्राणी मित्र दाखल झाला आणि परिस्थिती पाहिली. त्यावेळी कुत्राचा मृत्यू झाला होता. 


इतर महत्वाची बातमी-


NCP Crisis: 'राष्ट्रवादी आमचीच', विधासभा अध्यक्ष नार्वेकरांच्या नोटीसेला अजित पवार गटाचे 260 पानी उत्तर