PMPML Bus Contractors Strike :  पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या (PMPML)  ठेकेदार अचानक संपावर गेले आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बस पुरवणाऱ्या ठेकेदारांचे तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे.  आज अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरात पीएमपीएल बस गाड्यांची संख्या कमी झाली आणि यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.


पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संपावर गेल्याने सामन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका सामान्य पुणेकरांना सहन  आहे. पुण्यात अनेक लोक पीएमपीएमने प्रवास करतात. त्यात आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे रोज या पीएमपीएमएलने प्रवास करतात. आज अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोहचायला उशीर झाल्याचं बघायला मिळालं.


पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या आहेत आणि इतर 900 बसेस या पीएमपी प्रशासनाच्या मालकीच्या आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी संप पुकारला आहे. मात्र या सगळ्याचा त्रास सामान्य नागरिकांना भागावा लागत आहे. 


PMPMLच्या तब्बल 900 बसेस आज रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत.. इंधनाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कुठून द्यायचे, असा सवाल करत या कंत्राटदारांनी संप पुकारला आहे. याचा फटका मात्र सामान्य पुणेकरांना बसतोय. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. 


विनातिकीट प्रवास महागात पडणार...


पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएमएल प्रशासनाने (PMPML) चांगलाच दणका दिला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता चांगलाच फटका बसणार आहे. सुरुवातीला विनातिकीट प्रवाशांकडून 300 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता मात्र दंडाची किंमत वाढवली आहे. 300 रुपये नाही तर आता विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. 16 फेब्रुवारीला 300 रुपये ऐवजी 500 रुपये इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या 10 मार्चपासून हा दंड आकारण्यात येणार आहे. त्या काळात प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणं महागात पडणार आहे. त्यामुळे प्रवास करताना नियमांचं पालक करा, असं आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.