पुणे : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad)  वाकड परिसरातील चालू बांधकामाची इमारत (Building) एका बाजूला अचानकपणे (Wakad Area) झुकलेली इमारत अखेर जमीनदोस्त आली आहे. ही इमारत अचनकपणे झुकली होती. या इमारतीमुळे अनेकांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे महापालिकेकडून ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. JCB आणि पोकलेनच्या साहय्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. 


वाकडला असलेली ही इमारत चार नाही तर दोन पिलरवर उभी होती. प्रत्येक इमारतीसाठी चार पिलर गरजेचे असतात. या चार पिलरवर सगळी इमारत उभी राहते. दोन पिलरवर तळमजला आणि त्यावर तीन मजले असलेली इमारत अचानकपणे झुकली. काल रात्री (13 फेब्रुवारी) इमारत झुकल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं रात्रीपासून अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पोलीस प्रशासन (PCMC Police) या इमारतीजवळ दाखल झालं होतं. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती पसरली होती. अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही इमारत पाडण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने या इमारतीची संपूर्ण पाहणी केल्यावर इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. 


कोणावर कारवाई होणार?


पिंपरी चिंचवडमधील निर्माणाधिन इमारत अचानकपणे झुकली, जी सध्या जेसीबी आणि पोकलेनच्या आधारे पाडण्यात आली. पण आता या इमारतीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचं, चुकीच्या पद्धतीने स्ट्रक्चर उभारल्याचं दिसून आलं. ही डोळेझाक स्थानिकांच्या जीवावर बेतणारी होती. म्हणूनच पालिकेकडून आता चौकशीचा फास आळवला जाणार आहे. चौकशीनंतर आर्किटेक, बिल्डर आणि परवानगी देण्याऱ्या अधिकाऱ्यापैकी नेमकी कोणावर आणि काय कारवाई होणार? की त्यांना अभय दिलं जाणार?  हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 



रात्री वाकडमध्ये मोठा गोंधळ


पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड परिसरात ही इमारत झुकल्याचं कळताच परिसरांतील अनेक लोकांनी ही इमारत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आजूबाजूच्या परिसरातील लोक घाबरलेल्या अवस्थेत होते. ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनही या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यासोबतच अग्निशमनदलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं दाखल झालं होतं. लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांना त्यांना आवरावं लागलं आणि त्यानंतर काम करणं शक्य झालं. शिवाय कोणत्याही माणसाला धोका होणार नाही याची काळजी घेतली गेली.


इतर महत्वाची बातमी-


Pune Medha Kulkarni : भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का? राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?