Pune News LIVE Updates : Pune: शेतात पिकवला गांजा, पोलिसांकडून दोघांना अटक

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 23 Oct 2021 12:48 PM
पुण्यात काल लोणी काळभोर परिसरात झालेल्या गोळीबाराचे  सीसीटीव्ही फुटेज समोर

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये टोळीयुद्धात काल दोघांची हत्या झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काल संतोष जगताप नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली तर संतोष जगतापच्या खाजगी अंगरक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मारेकऱ्यांपैकी स्वागत खैरे नावाचा तरुण मारला गेला होता. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी पुण्यात टोळीयुद्धातुन झालेला हा गोळीबार पोलीस दलासमोरही प्रश्न निर्माण करणारा आहे.

पिंपरी चिंचवडमधील एलेनेट्स बेक कारखान्याला आग, दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

पिंपरी चिंचवड मधील 'एलेनेट्स बेक' या कारखान्यात आग लागली आहे. लेनेट्स बेक हा कारखाना विविध केमिकलचे उत्पादन करणारा आहे. कारखान्यातील मोटर वायनडिंगसाठी लागणाऱ्या वार्णीश केमिकलचा जळून खाक झाला आहे. त्यामुळे पाच टन वार्णीश केमिकलचा खाक झाला आहे. सहा च्या सुमारास ही आग लागली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिका, प्रदेश विकास प्राधिकरण दलाच्या 8 ते 9 गाड्यांनी दीड तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आणली आटोक्यात आणली आहे.

मी कोणताही कारखाना विकला नाही : हर्षवर्धन पाटील

मी सहकारमंत्री असताना सहकारी साखर कारखाने विकले गेले पण सहकार मंत्री म्हणून माझी त्यामधे भूमिका नव्हती. मी कोणताही कारखाना विकला नाही. कारण कारखान्याची विक्री कारखान्याला कर्ज देणारी बॅंक किंवा महामंडळ करत असते. कुठल्या साखर कारखान्यांची विक्री करण्यात आलीय याची यादी माझ्याकडे आल्यावर मी यावर बोलेन. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टर 10 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.  पण ती तुटपुंजी आहे. सरकारने या दहा हजार रुपयांच्या व्यतिरिक्त आणखी चाळीस हजार प्रति हेक्टर मदत द्यावी.  राज्यातील पंचावन्न लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालय असं सरकार म्हणतय पण प्रत्यक्षात हा आकडा शंभर लाख प्रति हेक्टर आहे. सरकारने ही मदत दिली नाही तर आम्ही दिवाळीनंतर आंदोलन करू. 

अजित पवारांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटील याचं उत्तर

मुळात आम्ही कोणाला कशापासून रोखलं नाही. 64 कारखाने विकले तर त्या सर्वांची चौकशी करा. पण जरंडेश्वर कारखान्याचा विषय आहे, हा विषय ईडी कडे आहे. म्हणजे हा मनी लॉंड्रिंक चा विषय आहे. मग उर्वरित कारखान्यांची ही मनी लॉंड्रिंक ची चौकशी करावी. उर्वरित कारखान्याचा आणि जरंडेश्वर कारखान्याचा विषय वेगळा. ते कमी किमतीत विकले गेले. ते कसे विकले गेले यासाठी राज्य सहकारी बँकेची चौकशी करायला हवी. त्या बँकेवर अजित पवार संचालक आहेत, म्हणजे त्यांची ही चौकशी व्हायला हवी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा अपघात 

पुणे- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. 

मी एनसीबीचा अधिकारी नाही - चंद्रकांत पाटील

मी एनसीबीचा अधिकारी नाही आणि या वयात तशी काही शक्यता ही नाही. त्यामुळे एनसीबी जी काही कारवाई करत आहे, त्यावर मी टिप्पणी करणार नाही. पण मला सामान्य नागरिक म्हणून असा प्रश्न पडलाय की ह्यांना शाहरुख खानच्या मुलाचा इतका पुळका का आलाय. नवाब मलिक यावर रोज काहीतरी बोलणार, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात. महाराष्ट्रात रोज तीन-चार महिलांवर अत्याचार होतात. त्यावर हे बोलत नाहीत. त्यावर एवढी तत्परता का दाखवत नाहीत. शाहरुखच्या मुलाला जामीन मिळत नाहीत म्हणून.... एक बरंय की हे उच्च न्यायालयावर संशय घेत नाहीत. आता न्यायालय जामीन देत नाही, याचा अर्थ या प्रकरणाच्या पायामुळापर्यंत जाण्यासाठी या यंत्रणेला हे सगळे आणखी काही दिवस ताब्यात हवे असतील. त्यासाठी महाविकासआघाडीने एवढं तडफडण्याचं काय कारण आहे. बाकी काही ह्यांना काही काम-धाम नाही. याबाबत जनता त्यांना जाब विचारतील.

Pune: शेतात पिकवला गांजा, पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे शहर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या शेतावर गांजाचे उत्पादन करून त्याची विक्री केली आहे. पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या गांजाची एकूण 250रोपे जप्त केली आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. 

पार्श्वभूमी

पार्श्वभूमी 


पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं.


पुण्यात भीषण अपघात, सेल्फी पॉईंटजळ दोन जणांचा मृत्यू


पुणे- बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ शुक्रावारी रात्री झालेल्या एका अपघातात दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमार अपघात झाला. थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्राव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 12 जण जखमी झाल्याचं समजतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजेतय. त्यामुळे या दुर्देवी अपघातील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


अजित पवारांचा नियोजित दौरा रद्द



अजित पवार त्यांच्या आजच्या नियोजित दौऱ्यातील शेवटचा कार्यक्रम रद्द करून मुंबईला गेले असले तरी शरद पवार मात्र संध्याकाळी बारामतीत मुक्कामाला आलेत.  आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी आपण भेटणार असल्याच म्हटले होते.


पुणे मेट्रो उड्डाणपुलासाठी ‘नागपूर पॅटर्न’



पुणे मेट्रोच्या उड्डाणपुलासाठी नागपूर पॅटर्न राबवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पाडला.  अनेक तंत्रांची वापर करण्यात आलाय.  हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे  काम सुरु करण्यात येईल. - अजित पवार



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.