Pune news : पुण्यातील सौदामिनी हँडलूम या अनघा घैसास यांच्या दुकानातील स्टाफकडून धक्काबुक्की झाल्याचा आणि अनघा घैसास यांच्याकडून सोशल मीडियावर धमकावल्याचा आरोप गौरी शेटे आणि मोहन शेटे यांनी केला आहे. मोहन शेटे हे गेली अनेक वर्ष राष्ट्रीय स्वंयसेवक संघात कार्यरत असून पुण्यातील ऐतिहासिक स्थळे आणि ऐतिहासिक घटना यांचा त्यांचा अभ्यास आहे.


अनघा घैसास यांच्या सौदामिनी हँडलूममधे दो धागे राम के लिये या उपक्रमाच्या अंतर्गत 22 जानेवारीला आयोध्येतील राम मंदिरात प्रतिष्ठापना होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी वापरल्या जाऊ शकणार्‍या अनेक शेल्यांपैकी एक शेला विनण्यात येतोय.  त्यासाठी नागरिकांनी सौदामिनी हॅडलूममधे येऊन धागे विनावेत असं आवाहन अनघा घैसास यांनी केलंय.  मात्र गौरी शेटे आणि मोहन शेटे हे तिथे गेले असता त्यांना बाऊन्सर्सनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप गौरी शेटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आणि व्हिडीओ तयार करून पोस्ट केला आहे.


गौरी शेटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंंय?


'दो धागे श्रीराम के लिए' च्या अनघा ताई घैसास यांनी काल मध्यरात्री माझ्या पोस्टवर येऊन कमेंट बॉक्समध्ये अत्यंत अर्वाच्य भाषेत मला जे लिहिलं, खेटरानं पूजा करणं, 'बघूनच घेते' ही धमकी देणारी कमेंट लिहिली त्याचा स्क्रीनशॉट. ही कमेंट त्यांनी नंतर डिलीट केली. का डिलीट केली त्यांचं त्यांनाच माहिती. पण आता आमच्या जीवाला धोका जाणवल्याने मला सोशल मिडियाचा आधार घेणं गरजेचं आहे, असं गौरी शेटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंंय. या पोस्टपूर्वीदेखील  त्यांनी दोन पोस्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आहे. याच पोस्टवर अनघा घैसास यांनी कमेंट करुन फालतू बाई, असा शेटे यांचा उल्लेख केला आहे. 



 



अनघा घैसासांनी कमेंटमध्ये काय लिहिलंय?


गौरी शेटे .... इतकी प्रसिद्धीची हौस ?
प्रसिद्धी स्वत:च्या कर्तृत्वानी मिळवा. मुळात बोला.
खरं तुम्ही पेट्रोल पंपावरील हातमागांजवळ अत्यंत किळसवाणा व आक्रस्ताळी तमाशा केलात. हा कार्यक्रम विणकरांच्या सन्मानासाठी केलेला असताना विणकरांनाच तुमचे फालतु फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी त्रास दिलात. मुळात
तिला विणकर तिथे तुमचे फोटो काढण्यासाठी आले नव्हते, विणकाम शिकवण्यासाठी आले होते. त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी नकार दिल्यावर खूप बडबड केलीत. तिथे माझ्या स्टाफमधील मुली होत्या. त्याही याच्या साक्ष आहेत. त्यातल्याच एका मुलीचा हात पिरगळलात, मारलत . अर्थातच लेडी बाऊंन्सरनी तुम्हाला पकडलं, चांगला चोप दिला. तेवढ्यात मी समोरून हे पाहिलं व पटकन रस्ता क्रॉस करून आले. मला पाहताच बाऊंन्सरच्या हातातून सुटून तुम्ही पळून जात असतानाच मी ECf दुसऱ्या एका बाऊंन्सरनी तुम्हाला पकडलं व तुम्ही पुन्हा लेडी बाऊंन्सरचा मार खाल्लात. तुमचा चेहरा आत्ता प्रोफाईलमधे पाहताक्षणी मी तुम्हाला ओळखलं. तसच मी तुम्हाला प्रेमानी समजावून आत वगैरे घेतलं हे खोटं का सांगता ? माझ्या स्टाफमधल्या मुलीला तुम्ही मारल्यावर मी काय आरती ओवाळीन तुमची ? खरं तर मी तुमची चांगली खेटरानीच पुजा करायला हवी होती. चुकलंच माझं. आहो तुमचे पती इतकं चांगलं काम करतात, का त्यांची लाज घालवता ? तुम्ही एका अत्यंत सात्विक कार्यक्रमात विघ्न घालायला आलेल्या राक्षसिणीसारख्या आला होतात. बरं झालं आता ओळख पटली. आता बघतेच तुमच्याकडे. माझा कार्यक्रम खराब करून पुन्हा फेसबुकवर माझ्याच कार्यक्रमाची बदनामी करता ? इतकी प्रसिद्धीची हौस असेल तर काहितरी चांगलं काम करा. शी:शी: शी:
किळस आली मला तुमची .... फालतू बाई ...


'दो धागे श्री राम के लिए' उपक्रम नेमका काय आहे?


येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी पुण्यातील सौदामिनी हँडलूम यांच्यातर्फे वस्त्र विणण्यात येत आहे. त्यासाठी हातमाग कारागिरदेखील पुण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण पुणेकरांना रामलल्लांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी सौदामिनी हँडलूमच्या सर्वेसर्वा अनघा घैसास यांनी उपलब्ध करुन दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाला हातमागावर दोन धागे विणण्याची संधी मिळाली आहे आणि याचमार्फत रामलल्लाची सेवा करण्याची संधीदेखील मिळत आहे. 'दो धागे राम के लिए' म्हणत अनेक पुणेकर उत्साहाने हे वस्त्र विणताना दिसत आहे. 


कोणत आहेत अनघा घैसास? (Who is Anagha Ghaisas)


अनघा घैसास यांच्या हातमाग आणि साडी विणकामाचा अभ्यास आहे. त्याचं पुण्यातील फर्ग्यूसन रस्त्यावर सौदामिनी हँडलूम नावाचं दुकान आहे. या दुकानात कारागिर हातमागावर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा वस्त्र विणतात. 2014 पासून अनघा घैसास या व्यावसायात आहे. विणकाम, विणकाम करणारे कारागिर आणि विणकामाची कला जोपासण्याचं काम त्या करत आहे. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा अशा मोठ्या स्वरुपाचे विणकाम महोत्सव पुण्यात आयोजित केले आहे. विणकाम कारागिकांची मेहनत  आणि त्यांचं काम सामान्य जनतेपुढे आणण्याचा त्यांचा मुख्य हेतू आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Toilet Seva App : पुणेकरांसाठी 'टॉयलेट सेवा ॲप; शहरातील स्वच्छतागृहाची माहिती आता एका क्लिकवर!