Purandar Crime : पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यासह (Pune News) साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक (Pune ACB Trap) विभागाकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (anti corruption bureau) विभागाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. काही माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅकमेल असल्याच्या कारणावरून तक्रारदराने सासवड पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्या अर्जावरून गुन्हा नोंद (Pune Crime News) करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी 3 लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. ही घटना उघड झाल्याने सगळीकडे चर्चेला तोंड फुटलं आहे. 


पुरंदर (Purandar) तालुक्यातील सासवड नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेश जगताप (Ganesh jagtap) यांच्यासह अक्षय सुभाष मारणे (Subhash Marne) यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकाला देण्यासाठी, तीन लाख रुपये लाच एक जणाकडे मागितली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून याबाबतची कारवाई केलीय. या घटनेने पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


अक्षय सुभाष मारणे, गणेश बबनराव जगताप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश बबनराव जगताप हा आमदार संजय जगताप यांचा चुलत भाऊ असल्याचं सांगितलं जातंय. तसेच तो युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव देखील आहे असं बोललं जातंय. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गणेश जगताप याच्यासह मारणेला अटक केल्यानं राजकीय वर्तुळात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.


 पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ
पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा  आमदाराचा चुलत भाऊ निघाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.  या घटनेमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा आता सुरू झाल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक क्रांती पवार, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद आयचीत यांनी केली आहे. या प्रकरणात राजकीय नेत्याचे नाव आल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. संजय जगताप यांचा नातेवाईक असल्याने दबक्या आवाजात राजकीय चर्चा सुरु आहे. तसेच ते दोघेजण अजून कुठल्या राजकीय नेत्यांची कामे करतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.