Ladki Bahin Yojana program: आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana program) शुभांरभ केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाच्या आधी काही काळ बदल करण्यात आला आहे. आधी या कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नव्हते, काही काळानंतर दुरुस्त केलेल्या नव्या पत्रिकेत शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाचा समावेश करण्यात आला आहे. 


आज पार पडणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana program) आजच्या कार्यक्रम पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. दुरुस्त केलेल्या नव्या पत्रिकेत शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. आधीच्या पत्रिकेत शरद पवारांचे नाव नव्हते. राज्य सरकारच्या आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, शरद पवार हे आज नागपुरात असल्याची माहिती आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


लाडकी बहीण योजनेचा शुभारंभासाठी पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थितीची सक्ती?


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडीत होणार आहे. यात किमान पंधरा हजार महिलांची हजेरी अपेक्षित आहे. हीच गर्दी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात आलीये का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आपण कुठं, कशासाठी आणि का चाललोय? याबाबत या महिला अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना गर्दी करण्याचं टार्गेट महायुती सरकारने दिल्याचं बोललं जातं आहे. यातूनच पिंपरी पालिकेने असा उपद्व्याप केल्याची चर्चा रंगलेली आहे.


कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित


आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहेत.


कार्यक्रमासाठी 15 हजार महिला राहणार उपस्थित


राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे.