Pune News :  पुण्याच्या (Pune) चांदणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने येथीस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीये. याचाच भाग म्हणून मुंबई- बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जातील.


पौड मुळशीहुन पुण्यात येणारी वाहतूक मोठया प्रमाणात आहे. या चौकातील पूल पाडला जाणार असून त्याला पर्यायी रस्ता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  पूल पाडल्यानंतर महामार्गवरील दोन लेन वाढणार आहेत त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होणार आहे.  गेले अनेक वर्षांपासून चांदणी चौकातील वाहतूक कोंडी प्रश्न प्रलंबित होता तो आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर आता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या चांदणी चौकाची पाहणी करणार आहेत. गेले दोन वर्षांपासून चांदणी चौकात उड्डाणपूल काम सुरू आहे त्यातून ही परस्थिती उद्भवत आहे. त्यामुळं आता हा पूल पण पाडला जाणार आहे. सातारा येथून मुंबईकडे परत येताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी दोन वाजता पुण्यातील चांदणी चौक येथे थांबणार आहेत, अधिकाऱ्यांशी वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा करणार आहेत.


चांदणी चौकात अडकला होता मुख्यमंत्र्यांचा ताफा
काल (27 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याचीचांदणी चौकातील हायवेवरुन साताऱ्याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला. शहरात सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याची चांदणी चौकात ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं. गेल्या दोन वर्षांच्या कोंडीबाबतची माहिती दिली. तुमची तर अवघ्या पंधरा मिनिटांत सुटका झाली पण आमचं काय? आम्ही या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न त्यांना विचारला.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: