Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जूनला मतदान होत असून शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात उभे असणारे उमेदवारांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी शरद पवारांनी त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांना केलं.

Sharad Pawar Speech : शरद पवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रातील चांगला नावलौकिक असलेला कारखाना म्हणजे माळेगाव. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात इथे कोणीही राजकारण आणलं नाही. सभासदांचे हित कामगारांचे भलं हा दृष्टिकोन कायम ठेवला. अनेक निवडणुका झाल्या अनेक लोक निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लोक एकत्र आले आणि संस्थेचे काम केले. मात्र यंदाच्या वर्षी निवडणुकीमध्ये वेगळी स्थिती आहे.

दुर्दैवाने राजकारण आणायचं नाही हा निर्णय घेतल्यानंतरही आज या ठिकाणी एक वेगळं राजकारण आणलं गेलं असं चित्र दिसत आहे. हे कारखान्याच्या अर्थकारणासाठी, सभासदांच्या भल्यासाठी आणि कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी योग्य नाही. मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे. माळेगावचे सभासद जे योग्य आहे त्याला साथ देतील. 

तुम्ही लोक एका जिद्दीने या निवडणुकीला सामोरे जात आहात. एका बाजूला प्रचंड साधनसामग्रीचा डोंगर दिसत आहे. पण तुमच्याकडे साधनसामुग्री नाही, सामान्य सभासदांचा दर्या समुद्र तुमच्याकडे आहे. त्यामुळे सामान्य सभासदांचा समुद्र या डोंगराला सुद्धा उत्तर देऊ शकतो. उद्याच्या 22 तारखेला ते काम इथले मतदार करतील. याचा मला पूर्ण विश्वास आहे. 

माझ्या तुम्हाला सर्वांना अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत. लोकांनी तुम्हाला संधी दिल्यानंतर एकत्र येऊन स्वच्छ कारभार, विकासाला प्रोत्साहन द्या. सभासद, कामगार यांच्या हिताशी तुम्ही कधीही तडजोड करू नका एवढीच माझी अपेक्षा आहे. असताना मी कारखान्याचा सभासद आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांचं हित तुमच्या हातात आम्ही देऊ इच्छितो. बाकीच्या जनतेने तुमच्या हाताला हात लावावा. 

Malegaon Karkhana Election : माळेगाव कारखान्यासाठी रविवारी मतदान

माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनेल, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचे बळिराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

ही बातमी वाचा: