पुणे: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण सापडले असल्याची माहिती आहे. आय सी एम आर एन आय व्हीला तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम विरोधात महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात टीम दाखल करणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो.
वेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स घेतल्या असेल किंवा एच वन एन वनच्या वॅक्सिंग घेतल्या असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो. याचे निदान करण्यासाठी स्पाइनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपाय म्हणून प्लाज्मा एक्सचेंज सारखे उपचार केले जातात. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही, अशी माहिती आहे.
पुणे शहरातील 6 आणि बाकी रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते, पुण्याच्या बाहेरील हे रुग्ण आहेत अशी माहिती आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय ?
1)गुलेन बॅरी सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार, आजारामुळे स्नायू कमकुवत होतात.
2) स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.
3) चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास
4) हाताची बोटं, पाय यांत वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणं