पुणेपुण्यात (Pune Crime News) कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर  आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवण्यात आला आहे. कोंढवा (Kondhwa Crime) भागात असणाऱ्या सोसायटीमध्ये एका महिलेला पॅार्नस्टार म्हणत विनयभंग करण्यात आला. महिलेच्या नावाने मेल गेल्याचे महिलेला कळाल्यानंतर या प्रकरणी महिलेने तक्रार केली.  या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून एका व्यक्तीच्या पत्नीचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला. "जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, आज चालायला आली नाही का", असा  ई- मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून दिला. महिलेला आणि तिच्या पतीला ही बाब समजल्यानंर  महिला आणि तिचा पती या संदर्भात जाब विचारण्यास गेले. जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली आणि जे करायचं ते कर असं धमकावले. त्यानंतर हा सगळा प्रकारानंतर कोंढवा पोलिसात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 तक्रारदार महिलेच्या पतीसह झालेल्या वादानंतर आरोपीने बदला घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या संदर्भात सोसायटीतील सदस्यांशी देखील बातचीत करणार आहे.  


तरुणाचा राग अनावर, तरुणीचे नग्न फोटो थेट आईला पाठवले..


लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका (Pune Crime News) तरुणाने वीस वर्षीय तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. इतकंच नाही तर आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.  पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे