पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात नात्यांना काळीमा (Pune Crime News) फासणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहे. पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील हडपसर भागात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे. 


या प्रकरणी 25 वर्षाच्या पत्नीने आपल्या पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी  पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ) आणि सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पैशाच्या हव्यासापोटी पत्नीला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं होतं. आपल्या दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. सहा सात महिन्यांपासून नाही तर डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.


काही दिवसांपूर्वी ही महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला होता. तिला जातीवाचक शिवीगाळ केली होती. आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेने घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांत पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे.


पतीसमोरच पत्नीवर अत्याचार पण...


काही दिवसांपूर्वी पतीसमोरच पत्नीवर अत्याचार केल्याचं समोर आलं होतं.  उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने (Savkar) त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार (Rape) केला होता. इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली होती. 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली होती. पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. सोबतच तक्रारदार महिलेसोबत पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यावेळी पतीही शांतपणे सगळं बघत असल्याने पतीवर संताप व्यक्त केला जात होता. 


इतर महत्वाची बातमी-


Bhandara News : भंडाऱ्यात शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घडली घटना