गिरीश महाजन यांनी आज फुटलेल्या मुठा कालव्याला भेट दिली. त्यानंतर उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी कालवा फुटल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचं गिरीश महाजन म्हणाले. तरीही तरीही कालवा नक्की कशामुळे फुटला हे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
खडकवासल्यातून मुठेच्या कालव्यात पाणी सोडलं जातं. तीन तालुक्यांच्या शेतीला पाणी जातं. पण त्याविरोधात उंदीर, घुशी, खेकड्यांनी कट केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात जितकी धरणं, कालवे आणि जलसाठे आहेत, तिथंही उंदीर, घुशी, खेकड्यांची कटकारस्थान सुरु आहेत का? याची चौकशी व्हायला पाहिजे.
आता जलसंपदा विभागाने मुठा कालव्याचे गुन्हेगार शोधले आहे, पण त्याआधी खरी कारणंही होती ती बघा..
- खडकवासल्यातून निघणाऱ्या कालव्याची पूर्ण लांबी 35 किलोमीटर आहे
- 2006 पासून हा कालवा पाईपबंद करण्याचा प्रस्ताव आहे
- त्यामुळे कालव्याचं अंतर 35 किमीवरुन थेट 24 किमीवर येईल
- कालव्यातून जे 2.5 टीएमसी पाणी वाया जातं, तेही वाचेल
- याचा खर्च 1500 ते 2500 कोटीच्या घरात आहे
- पण कंत्राट कुणाला द्यायचं यावरुन वाद आहे
आणि याचाच परिणाम कालव्याच्या भिंतीवर होऊन ती कोसळली आहे.
संबंधित बातम्या
केबल्समुळे मुठा कालव्याची भिंत फुटल्याचा अंदाज
मुठा कालवा भगदाड : मुलाच्या शिक्षणासाठीचे पैसे वाहून गेले
मुठा कालवा भगदाड : झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार : बापट
मतं मागायला येता, मदतीला कधी येणार, पुण्याच्या महापौरांना घेराव
पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली?
बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..!
पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र