स्त्री अस्मितेचा हुंकार आपल्या लेखनातून मांडणारी हरहुन्नरी लेखिका अशी त्यांची ओळख होती. 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ब्र' या कथासंग्रहामुळे कविता महाजन नावारुपास आल्या. याशिवाय त्यांनी लिहिलेली भिन्न, कुहू, ग्राफिटी वॉल यासारखी पुस्तकंही गाजली. कविता महाजनांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.
न्यूमोनियाचं निदान झाल्यामुळे कविता महाजन यांना पुण्यातील चेलाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजार बळावल्यामुळे स्वाईन फ्लूच्या चाचण्याही केल्या, मात्र त्यांना स्वाईन फ्लू नसल्याचं स्पष्ट झालं. परंतु न्यूमोनियाने तब्येत खालावल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
कविता महाजन यांचं शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झालं होतं. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं.
कविता महाजन गेली दोन वर्ष 'एबीपी माझा'साठी 'चालू वर्तमानकाळ' आणि 'घुमक्कडी' या सदराखाली ब्लॉग लेखन करत होत्या.
पुरस्कार
2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार
2008 मध्ये कवयित्री बहिणाई पुरस्कार
2011 मध्ये साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी)
2013 मध्ये ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार
कविता महाजन यांच्या अंतिम काळातील भावनिक पोस्ट