पुणे : रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांवर उपचार करावेत. तसेच रुग्णांकडून चेकद्वारे पैसे घेण्यात यावेत. कुणाचीही नोटांअभावी अडवणूक करण्यात येऊ नये, असे आदेश पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

चेक न वठल्यास मुख्यमंत्री निधीतुन दहा हजारांपर्यंत पैसे मिळतील, असं आश्वासनही आयुक्तांनी रुग्णालयांना दिलं आहे. यानंतरही एखाद्या रुग्णालयाने उपचार नाकारल्यास ०२० - २५५०८५०० या क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

पुण्यात रुबी हॉल क्लिनिकने चेकपेमेंट नाकारल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, असा आरोप पीडित दाम्पत्याने केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्व रुग्णालयांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातमी : पुण्यात चेक स्वीकारण्यास हॉस्पिटलचा नकार, अर्भकाचा मृत्यू