पुण्यात दुचाकीच्या डिकीतून 60 हजार लंपास, लहानगे ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 03:20 PM (IST)
पुणे : अल्पवयीन मुलांनी दुचाकीच्या डिकीतून 60 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना पुण्यात उघडकीस आलीय. महत्त्वाचं म्हणजे या चोरट्यांची हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. स्वारगेट परिसरातल्या महर्षीनगरमधल्या या घटनेत पोलिसांनी 4 मुलांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलंय. केवळ मौजमजेसाठी चोरी केल्याचं या मुलांचं म्हणणं आहे. एका महिलेनं तिच्या दुचाकीच्या डिकीतून 60 हजारांची चोरी झाल्याची तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मुलांना ताब्यात घेतलंय. या लहान मुलांच्या मागे कोणती मोठी टोळी आहे काय? याचाही तपास पोलीस करत आहेत.