Pune Metro News : एप्रिल महिन्यात पुणेकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो मार्गिका येणार आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक यादरम्यान मेट्रो मार्गिकेचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्च अखेरपर्यंत या मार्गिकेचं काम पूर्ण होणार आहे. तसेच एप्रिलमध्ये मेट्रो पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.
गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिकन स्थानक यादरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च अखेरीस हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर केंद्रीय समितीचा पाहणी दौरा होणार आहे. एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे. गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनीक स्थानक या दरम्यान डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका, शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक ही स्थानके आहेत.
गरवारे महाविद्यालय स्थानक ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेअंतर्गत डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्या या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. या दोन्ही स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर एप्रिलमध्ये मेट्रो पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.
गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक यादरम्यानच्या मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु झाल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफएस रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महापालिका, आरटीओ, वाडिया महाविद्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.
दरम्यान, पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली चाचणी 16 ऑगस्ट 2022 रोजी घेतली. पुणे मेट्रोचे वनाज ते गरवारे आणि PCMC ते फुगेवाडी हे विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च 2022 रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर सुरु करण्यात आले होते. पुणे मेट्रोने फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन पर्यंत रीच 1 आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन पर्यंत पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे दिवाणी न्यायालयाकडे आणि फुगेवाडी येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आणखी वाचा :
Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार! सीप्झ ते कुलाबा दरम्यान डिसेंबरमध्ये धावणार मेट्रो