Pune Metro News:  पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली. पुणे मेट्रोचे वनाज ते गरवारे आणि PCMC ते फुगेवाडी हे विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च 2022 रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर सुरु करण्यात आले होते.


 पुणे मेट्रोने फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन पर्यंत रीच 1 आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन पर्यंत पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे दिवाणी न्यायालयाकडे आणि फुगेवाडी येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.


सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी  सुरुवात झाली. त्याचप्रमाणे ते फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक या टप्प्यावर सुद्धा मेट्रोची ट्रायल झाली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल वेग 15 KMPH होता आणि तो नियोजित प्रमाणे पूर्ण करण्यात आला.


आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित विभाग उघडण्यासाठी तयारीत आहोत आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत  आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रोपर्यंत पहिली ट्रेन ट्रायल चालवली जाईल, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितलं.


 मेट्रोचा रेकॉर्ड मोडला
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अनेक पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी मागील दिवसाचा विक्रम मोडला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 70,000 हून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला. मागील दैनंदिन रायडरशिप रेकॉर्ड प्रति दिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या ऑगस्टच्या दिवशी रायडरशिप दररोज 75,000 प्रवासी पार करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.