पुणे : पुणे (Pune Loksabha election 2024), मावळ आणि शिरुरमध्ये (EVM Machine Not working) अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील इंटरनॅशनल स्कूल मतदान केंद्रावरील EVM मशीन बंद पडले आहे. त्यामुळे काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आलं आहेत. EVM मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान बंद ठेवावं लागलं. EVM मशीन बंद झाल्याने अनेक नागरिकांना रांगेत थांबावं लागलं. 


यातील एका खोलीमधील मतदान सुरू असलं तरी सुद्धा दुसऱ्या खोलीत मात्र मशीन बंद पडल्यामुळे मतदान थांबवण्यात आलंआहे. प्रशासनाकडून मशीन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


त्यासोबतच तळेगाव दाभाडे येथील गणेश वाचनालयातील मतदान  टेक्निकल एरर मुळे काही वेळासाठी बंद पडले होते. यावेळी नागरिकांना रांगेत उभं रहावं लागलं. मात्र कर्मचारी आणि प्रशासनाने लगेच कामाला लागते आणि त्यांनी मशीन दुरुस्त केलं. बियुमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण युनिट बदलावे लागले. त्यामुळे काही काळ मतदान बंद होते. आता मतदान सुरळीत सुरू झाले आहे.


हाच प्रकार टिंगरे नगर परिसरातदेखील पाहायला मिळाला.  टिंगरे नगर बूथ क्रमांक 132, 133 बंद झाले होते. 1 तास मशीन बंद पडल्याने मतदार रांगेत खोळंबले. 


मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि  14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.


शिरूर लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 8 कंट्रोल यूनिट आणि 24 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. शिरूर लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.


पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 37 बॅलेट युनिट 13 कंट्रोल यूनिट आणि  17 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. पुणे लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.


इतर महत्वाची बातमी-


बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर


Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार


 नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये चुरशीची लढत, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज