पुणे : आपली लोकशाही ही देशातली सुदृढ लोकशाही आहे आणि आपण या लोकशाहीचा भाग आहोत आणि मतदान आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्याला बजावलं पाहिजे. त्यामुळे मोठ्या संख्येने पुणेकरांनी एकत्र येत मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar nMohol) यांनी मतदानापूर्वी केलं. मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे.
मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. मतदानाला जाण्यापूर्वी मुरलीधर मोहोळांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. त्यांनी घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला आणि त्यानंतर ते कुटुंबियांसोबत मतदानासाठी रवाना झाले.
मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळांच्या आईने दिली आहे, तर मागील 20 वर्ष मुरलीधर मोहोळांनी खूप काम केलं. लोकसभेची उमेदवारी त्याचीच पावती आहे, असं मुरलीधर मोहोळांच्या पत्नी म्हणाल्या. मुरलीधर मोहोळ शंभर टक्के जिंकणार असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. त्यांच्या आईलादेखील अश्रु अनावर झाले.
प्रत्येक मतदानापूर्वी पैशाचा बाजार असलेल्या बातम्या येतात. त्यात काल रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला आणि पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. त्यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, साधारण प्रत्येक मतदानाच्या आदल्या दिवशी हे सगळं चित्र पाहायला मिळतं. पण मत कोणाला मिळतं हे पाहावं लागणार आहे. मतपेटीतून आता सगळं चित्र समोर येईल, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मोहोळांनी मागील काही दिवस मोहोळांनी भरपूर प्रचार केला. त्याच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील त्यांच्यासाठी सभा घेतली होती. पुण्यात तिरंगी लढत आहे. त्यात आता पुणेकर नेमकी कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये चुरशीची लढत, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज