पुणे : लोकसभा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो प्रत्येक पक्षाची आणि उमेदवारांची परिक्षाच (Lok Sabha Election 2024) मानली जाते. कोणाला किती जागा मिळतील पासून ते कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. मात्र आता निवडणूक कर्मचाऱ्यांनादेखील परिक्षा  द्यावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया विना अडथळा पार पडावी यासाठी यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची परिक्षा घेण्यात येत आहे. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये ही परिक्षा निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. 


निवडणूक कर्मचाऱ्यांची 50 गुणांची परिक्षा असणार आहे, असं  निवडणूक आयोगाने ठरवलं आहे. यासाठी 50 पैकी 38 मार्क मिळवणं गरजेचं असणार आहे. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांना  दोनवेळा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतरच ही परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच निवडणूक केंद्रावर जाता येणार आहे. अनुत्तीर्ण झाल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची अशा स्वरूपात परिक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.


अनेकदा निवडणूक केंद्रावर अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे काही वेळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागले परिणामी अनेकांना मतदानाचा हक्क बजवता येत नाही किंवा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा EVM मशीनमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम येत असल्याच्या तक्रारी येतात किंवा कर्मचाऱ्यांना मशीन हाताळणं कठिण जातं. मात्र या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परिक्षा घेण्यात येत आहे. 


पुणे जिल्ह्यात अशी प्रक्रिया घेण्यात येत आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातदेखील मतदान बाकी असलेल्या मतदार संघातील कर्मचाऱ्यांची परिक्षा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाही आहे. ही परिक्षा पास केलेले सगळे कर्मचारी मतदानाच्या दिवशी आत्मविश्वासाने आणि कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 


या कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक, सहकार विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद यासारख्या वेगवेगळ्या विभागातील हे शेकडो कर्मचाऱ्यांची परिक्षा होत आहे. या कर्मचाऱ्यांमुळे यंदा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे. देशाची निवडणूक ही बदलांचा स्विकार करत अपडेट होत सूदृढ होत आली आहे.  लोकशाही वरचा विश्वास कायम रहावा, यासाठी अशी पावलं निवडणूक आयोगाकडून उचलले जात आहे. 


आणखी वाचा 


देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, होय, ते सत्यच बोलले!