Prithviraj Chavan Congress News : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची (Congress) पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक पार पडली. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सुशीलकुमार शिंदेंची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडत या प्रश्नाचं उत्तर दिलं.
लोकसभेचा प्रश्न आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जोडले हात
पुण्यात आज काँग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले सर्व महत्त्वाचे नेते पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये उपस्थित आहेत. याच बैठकीच्या पूर्वी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पक्षाची एक पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून इच्छुक आहेत, असं समजते किंवा ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का ? असं विचारलं असता मंचावर उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क हात जोडले. यावर उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून कुठून उभे राहिले तर ते निवडून येतील असे उत्तर दिलं.
कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा बैठकांचे पुण्यात आयोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला इत्यादी नेते उपस्थित आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या बेठकांमधे घेतला आहे.
आणखी वाचा :
आयसीसीच्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय, रोहित-विराटला स्थान नाही, कमिन्सकडे नेतृत्व
मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही