Pune Latest News Update: एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला.. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.
दिपक थोटे ( वय. 59) इंदू दिपक थोटे ( वय.45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय.24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय.17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.
आणखी वाचा:
Pune Rapido News : पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; तडकाफडकी सर्व सेवा बंद करण्याचे आदेश