Pune Tempreture : पुणे, मुंबईसह राज्यातील तापमानात (Pune tempreture) वाढ झाली आहे. (Pune) सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. पुण्यातीलही परिस्थिती तशीच आहे. अनेक पुणेकरांना थंडी आणि उष्णतेचा (Heat) सामना करावा लागत आहे. या बदलत्या (climate change) वातावरणामुळे अनेक पुणेकरांना सर्दी-खोकल्याचा (Cough and cold) त्रास होत आहे. याचा फटका सगळ्यात जास्त लहान (Children) मुलांना जाणवत आहे. त्यामुळे पालकांना लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
थंड आणि उन्हाच्या अशा बदलत्या वातावरणात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाचा सामना करण्याची क्षमता कमी असते. त्यातून ही मुले आजारी पडण्तायाचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं, गरजेचं आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातही मुले आजारी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
गोवर आणि कांजण्यांच्या रुग्णात वाढ
या बदलत्या वातावरणामुळे मुलांमध्ये तापाची साथदेखील आहे. त्यासोबतच गोवर आणि कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांत तापाचं प्रमाण कमी कमी होत आहे. त्यामुळे मुलांना ताप आल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
खोकल्यामुळे पालक त्रस्त
पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं
काय काळजी घ्याल?
- उष्णतेच्या लाटेची चिन्हे आणि लक्षणे जाणून घ्या.
-हवामान अंदाजावर बारीक लक्ष ठेवा.
- पुरेसे पाणी प्या.
-सार्वजनिक आरोग्य सल्ल्यांबद्दल माहिती ठेवा.
- सनस्क्रीन आणि टोपी घाला.
- तुमचे घर हवेशीर ठेवा.
-अति उष्णतेमध्ये तुमच्या खिडक्या बंद ठेवा.
- अन्न आणि पाणी थंड ठिकाणी ठेवा.
-भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
-थंड, वातानुकूलित वातावरणात रहा.
-सैल-फिटिंग कपडे आणि सनस्क्रीन लावा.