Pune Kasaba Peth chinchwad By Election: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasaba peth pune) आमदार मुक्ता टिळक (Mukta tilak) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने या दोन मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या या दोन आमदारांच्या निधनानंतर या दोन मतदारसंघातील परिस्थिती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या दोन्ही जागांवर टिळक आणि जगताप यांच्या परिवारातूनच कुणाला तरी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


कसबा पेठमधून टिळकांच्या परिवारातूनच संधी?


भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक आणि पती शैलेश टिळक यांच्यासह भाजपमधे अनेक इच्छुक उमेदवार आहेत.  महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर, खासदार गिरीश बापट यांच्या सुन स्वरदा बापट, नगरसेवक धीरज घाटे असे अनेकजण इच्छुक आहेत. कॉंग्रेस ही पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट न दिल्यास कॉंग्रेस रोहित टिळक यांना उमेदवारी देऊ शकते.  राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद असल्याने निवडणूक झाल्यास राष्ट्रवादीची भूमिका देखील महत्वाची राहणार. 


लक्ष्मण जगतापांच्या पत्नी  किंवा भावाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता


चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा भाऊ शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताय.  अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते तर शंकर जगताप यांन उमेदवारी मिळाल्यास मागील वेळी लक्ष्मण जगताप यांच विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे  नाना काटे पुन्ह निवडणूक लढवू शकतात.  लक्ष्मण जगताप यांचे अजित पवार यांच्याशी नजीकचे संबंध राहिलेत.  त्यामुळे अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य मिळू शकते. शंकर जगताप यांच्या विरोधात मात्र राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट आणि कॉंग्रेस एकवटू शकते. 


पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या (Pune kasba peth chinchwad bypoll election ) पोटनिवडणुकांची  तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे आणि 2 मार्चला या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


Pune  Bypoll Election: पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान